लग्न समारंभात तुतारीची धून नवरदेवाने उखाण्यातून घातले मोहिते पाटलांना मत देण्याचे साकडे
अकलूज (रणजित गायकवाड )अकलूज पदमावती नगर येथील कै. नामदेव हरी पवार यांचे नातू व श्री शामराव नामदेव पवार यांचे जेष्ठ सुपुत्र सुधीर व कै,खंडू शंकर वायभासे यांची नात व श्री महादेव खंडू वायभासे केम. ता -करमाळा यांची द्वितीय कन्या स्वप्नाली (आरती )यांचा शुभविवाह रविवारी 28एप्रिल रोजी अकलूज येथील अकलाई मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून प्रचाराची जोरदार सुरुवात झाली. अनेक मतदार आपापल्या परीने आपल्या नेत्याचा प्रचार करीत आहेत.या विवाह सोहळ्यात देखील याची प्रचिती आली. वर सुधीर पवार यांनी एक अनोखा उखाणा घेतला.
घेऊन हाती विजयाची तुतारी गाढुन टाकू गद्दारी स्वप्नालीच नाव घेतो अब की बार ४००पार. पण माढ्यात फक्त धैर्यशीलभैय्यांचीच तुतारी……
लग्न सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या मध्ये या उखाण्याचीच चर्चा होती. या अनोख्या उखाण्याची चर्चा दिवसभर अकलूज परिसरात होती.या विवाहसोहळ्यासाठी व वधू वरांना शुभेच्छा देण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे सर्वं पदाधिकारी, नातेवाईक, मित्रमंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.






