मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषाणाच्या समर्थनार्थ १४ फेब्रुवारी रोजी माळशिरस तालुका बंद चे आवाहन.
सकल मराठा समाज महाराष्ट्र यांनी बैठकीत केलेल्या आवाहनानुसार त्या अनुषंगाने माळशिरस तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने माळशिरस तालुका कडकडीत बंदचे आव्हान करण्यात आले आहेआज रोजी माळशिरस तालुका सकल मराठा समाजाच्या झालेल्या बैठकी मधील निर्णयानुसार 14 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होऊन माळशिरस तालुक्यातील सर्व व्यवसायिकांनी आपली दुकाने फर्म बंद ठेवून सकल मराठा समाजाच्या आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात उपोषणास पाठिंबा द्यावा असेही आवाहन करण्यात आलेविशेषतः या बंदच्या काळात कोणीही रस्ता रोको करू नये, अथवा जाळपोळ करू नये ,आणि बंद शांततेत पाळून सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.






