माळशिरस तालुक्यातील मराठा आरक्षण साखळी उपोषणाची 47 व्या दिवशी सांगता
अकलूज (प्रतिनिधी )मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार माळशिरस तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने 8 नोव्हेंबर 2023 रोजी मराठा आरक्षणासाठी वेळापूर तालुका माळशिरस येथील पालखी चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते या साखळी उपोषणाची सांगता 24 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 3 वाजता संपन्न झाली यावेळी माळशिरस तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढील आंदोलनाची दिशा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार करण्यात येईल असे यावेळी सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने सांगण्यात आले यावेळी जय जिजाऊ जय शिवराय आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आशा घोषणांनी वेळापूर पालखी चौक दणाणून गेला होता






