रामजन्मभूमी अयोध्या येथून पुजाविधी करून आणलेल्या मंगल अक्षता कलश ची नगरप्रदक्षिणा अकलूज येथे उत्साहात संपन्न
अकलूज (प्रतिनिधी )अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत *प्रभू श्रीरामलल्ला* जन्मस्थळी २२ जानेवारीस विराजमान होणार आहेत. या ऐतिहासिक क्षणानिमित्त अयोध्येतून *मंगल अक्षता* पूजाविधी करून अकलूजमध्ये दाखल झाल्या होत्या.
या अक्षता व श्रीरामांच्या प्रतिमेची नगर प्रदक्षिणा रविवारी १७-१२-२०२३ रोजी सकाळी हनुमान मंदिर जुने ग्रामपंचायत – आंबेडकर चौक- जुने बस स्थानक-जुने पोलीस स्टेशन-गांधी चौक – जयशंकर उद्यान-विजय चौक – शिवापूर पेठ – हनुमान मंदिर.या मार्गाने पारंपारिक वाद्याच्या गजरात व श्रीराम जय राम जय जय राम या नामजपाच्या घोषात अतिशय उत्साही वातावरणात पार पडली.
हनुमान मंदिर या ठिकाणी अक्षता यांचे पूजन भाजपचे संघटन सरचिटणीस माननीय श्री धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पूजन करून पालखीमध्ये ठेवण्यात आले.
पुरुषांनी पारंपारिक वेश परिधान केला होता तर महिलां कलश,तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या, इस्कॉन चे भजनी मंडळ श्री स्वामीनारायण सत्संग चे बालसाधक शिवाजी महाराज,विठ्ठल रुक्मिणी, झाशीची राणी, अहिल्यादेवी, मावळे,श्रीराम सीतामाता व लक्ष्मण अशा वेगवेगळ्या वेशभूषा करून नगर प्रदक्षणे मध्ये सहभागी झाले.
सर्व श्री राम भक्त श्री राम जय राम जय जय राम या नामजपच्या मंत्र म्हणत या नगरप्रदक्षिणेत सहभागी झाले होते. ठीक ठिकाणी पालखी व रथ यावर पुष्प वृष्टी करण्यात आली.हनुमान चालीसा,मारुती स्तोत्र व श्रीरामांच्या आरतीने या कार्यक्रमाचा समारोप झाला.
या कार्यक्रमाचे नियोजन विश्व हिंदू परिषद,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, इस्कॉन, ब्रह्मचैतन्य महिला मंडळ व समस्त श्रीराम भक्त यांनी केले होते.















