राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अकलूज शहरात विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने पथसंचलन
अकलूज (प्रतिनिधी )राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अकलूज शहरात 22ऑक्टोबर रोजी विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने पथसंचलन झाले. हिंदू समाजाच्या शक्तीचे प्रदर्शन असणाऱ्या या संचलनाला अकलूज नगरपरिषदेपासून सकाळी ८.४५ वाजता सुरुवात झाली.
संचलन पाहण्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते . अकलूजकरांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून संचलनाचे स्वागत केले .सदर पथसंचलनामध्ये अश्वारूढ भगवा ध्वज घेतलेला स्वयंसेवक व भारतमातेची प्रतिमा असलेली जिप्सी गाडी हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
नामदेव मंगल कार्यालय या ठिकाणी झालेल्या उत्सवात शस्त्रपूजन व बौद्धिकाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून अकलुजचे प्रसिद्ध डॉ.मनोहर कालीदास इनामदार, एम.डी. मेडीसीन,अकलूज हे होते . तर प्रमुख उपस्थिती डॉ.रमेश संपती सिद मा.जिल्हा संघचालक व भीष्माचार्य कूदळे , मा. तालूका संघचालक यांची होती . वक्ते म्हणून श्री.निलेश प्रभाकर क्षिरसागर प्रांत बौद्धिक मंडळ सदस्य पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांनी विषय मांडणी केली .वरील मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजनही करण्यात आले .उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अकलूज व परिसरातील सर्व स्वयंसेवकांनी आपले योगदान दिले .












