तीस वर्षानंतर तरंगफळ येथील बंधारा भरून वाहू लागला.
अकलूज (प्रतिनिधी )
सुमारे तीस वर्षांपूर्वी तरंगफळ शिवारात महाराष्ट्राचे तत्कालीन बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे झाले होते. परंतु त्याची दारे लोखंडी असल्यामुळे त्याचा पाणी साठवण्यासाठी उपयोग झाला नाही.परंतु सहा महिन्यापूर्वी तरंगफळ चे सरपंच नारायण तात्या तरंगे व तरंगफळ चे ग्रामस्थ यांनी आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील व आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडे या बंधाऱ्याची दुरुस्ती होऊन नवीन दारे मिळावीत. ही विनंती केली ती विनंती मान्य करून दोन्ही बंधाऱ्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.आणि त्याचे काम पूर्ण होऊन रात्रीच्या पावसामुळे सध्या बंधारा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना व गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी याचा चांगलाच उपयोग होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्व ग्रामस्थ मोहिते पाटील परिवाराचे व आमदार यांचे आभार मानत आहेत.







