श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान चे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी )यांनी केले कै. रोहित सूर्यवंशी यांच्या कुटूंबाचे सांत्वन
अकलूज (प्रतिनिधी )16 सप्टेंबर 2023 रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान,अकलूज चे निष्ठावंत,धारकरी कै.रोहित बाळकृष्ण सूर्यवंशी यांचे अकलूज- वेळापूर रोड वर खंडाळी येथे अपघाती निधन झाले, त्यांच्या निधनाची बातमी कळताच, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी)यांनी फोनवरून या संपूर्ण घटनेची विचारपूस केली.
त्यानंतर 1ऑक्टोबर 2023 रोजी कै.रोहितरावं यांच्या अकलूज येथील निवासस्थानी सकाळी 10 वा. गुरुजी यांनी येऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. व रोहितरावं यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.तुम्ही धीर सोडू नका लवकर बऱ्या व्हा.तो परत येणार असेही गुरुजी कै. रोहितरावांच्या आईशी बोलताना म्हणाले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आपल्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे. असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
त्यानंतर सायंकाळी पाच वाजता इशिता लॉन्स अकलूज येथे कै.धारकरी रोहितराव सूर्यवंशी यांची शोकसभा पार पडली.याप्रसंगी सूर्यवंशी यांचे बद्दलचे असणारे प्रेम त्यांच्या आठवणी त्यांच्या स्मृतीना उजाळा द्यायचं काम सर्व धारकरी, समाज बंधु, मित्रपरिवार यांनी केले.या शोक सभेचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अकलूज, बुरुड समाज व मित्रपरिवार यांनी केले.









