• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभारामुळे अकलूजकर हैराण.

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
September 24, 2023
in आपले शहर
0
नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभारामुळे  अकलूजकर हैराण.
0
SHARES
307
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभारामुळे अकलूजकर हैराण.

अकलूज : (प्रतिनिधी )ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, गटारीचे पाणी रस्त्यावर, थोडा पाऊस पडला तरी रस्त्याचे नाल्यात रूपांतर, रस्त्यात खड्डे तर चांगल्या रस्त्यावर मुरमाचे ढीग, विजेचा लपंडाव, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, मात्र मालमत्ता कर व इतर कर व्याजासह वसूल करण्याचा दणका हे सुमारे 45 दिवस उपोषण करून मिळवलेल्या नगर परिषदेचे फलित असून,आता नगरपरिषदेबाबत भीक नको, कुत्रा आवर अशी अवस्था झाली आहे.

अकलूज ग्रामपंचायतीला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता भासत असून ती दूर करण्यासाठी नगरपरिषद हवी. नगरपरिषद आल्यावर स्वच्छ अकलूज आणखी स्वच्छ होईल, शौचालयाची विशेषतः महिलांसाठीच्या शौचालयाची सोय होईल, सांडपाण्याची चांगली व्यवस्था होईल, पिण्याचे भरपूर पाणी मिळेल, पथदिवे वाढतील, महावितरणकडून 24 तास लाईट मिळेल, रस्त्यावरील खड्डे बुजतील आणि या सर्व सुविधा मिळताना कोणतीही करवाढ होणार नाही अशी अपेक्षा होती.

परंतु प्रत्यक्षात मात्र उलटेच झाले. सुमारे 45 दिवस चक्री उपोषण करून शासन दरबारी विविध मार्गाने जाऊन नगरपरिषद मिळविली मात्र नगरपरिषद मिळून दोन वर्षे झाली तरी ना कोणती वाढीव सुविधा मिळाली ना मिळण्याची आशा वाटते.

ग्रामपंचायत असताना सुंदर व स्वच्छ अकलूज, पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन, व्यवस्थित चालू असलेले पथदिवे, सीसीटीव्ही हे अकलूजकरांना भूषणावह होते. नगरपरिषद आल्यानंतर शासन आदेशानुसार त्यांनी कचराकुंड्या काढून टाकल्या आणि काही लाख खर्चून घंटागाड्यांची संख्या वाढवली. परंतु रस्त्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग तसेच पडलेले आहेत. पिण्याच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन होत नाही, पथदिव्यांची संख्या वाढवली परंतु ते चालू असतातच असे नाही, सीसीटीव्ही आहेत त्यात कुठलीही प्रकारची सुधारणा नाही, सांडपाण्यांच्या व्यवस्थेसाठी नको असलेल्या ठिकाणी गटारी करण्यात आल्या.

गेल्या काही वर्षातील सर्वात कमी पाऊस पडूनही अनेक ठिकाणी तळे साचत आहे, रस्त्याला नाल्याचे रूप येत आहे. रस्त्यावरील छोटे खड्डे बुजवण्यासाठी मुरूम टाकण्यात आला. यातही काही ठिकाणी चांगल्या रस्त्यावर टाकलेल्या मुरमामुळे खड्ड्यांची संख्या वाढली‌.

नगरपरिषद आल्यावर पुरुषांच्या शौचालयाबरोबर महिलांच्या शौचालयाची ही सोय होईल अशी माफक अपेक्षा होती परंतु गेल्या दोन वर्षात महिलांसाठीचे एकही शौचालय उभारण्यात आलेले नाही.रस्त्यावरील वाहतूक, पार्किंग, वाहनतळ तसेच अग्निशामक दल उभारले जाईल अशीही अपेक्षा होती. परंतु मुख्याधिकाऱ्यांना फिरण्यासाठी गाडी घेण्यात आली मात्र अग्निशामन दलासाठी त्यांच्याकडे निधी नसल्याचे सांगितले जात आहे‌.

त्याचप्रमाणे अकलूज परिसरात ठिकठिकाणी अतिक्रमण आहे. परंतु या गोष्टीकडे मात्र कोणाचेच लक्ष नाही.एवढ्या सर्व असुविधा असूनही मालमत्ता कर, पाणीपट्टी गाळाभाडे आदींच्या दरवाढीची टांगती तलवारीने नागरिक भयग्रस्त आहेत.

वास्तविक थकित मालमत्ता कर, पाणी पट्टी,गाळाभाडे यावर कोणतेही व्याज महानगरपालिकाही लावत नाही‌. मात्र अकलूज नगर परिषदेने मालमत्ता कर, पाणीपट्टी, गाळा भाडं हे व्याजासह वसूल करण्याचा दणका लावला. प्लास्टिक बंदीसह आणखी काही निर्बंधबाबतचा कायदा दाखवत व्यापाऱ्यांची कुचेष्टा केली जात आहे.

माळशिरस तालुक्यात सध्या माळशिरस, नातेपुते, महाळुंग येथे नगरपंचायत तर अकलूज येथे नगरपरिषद आहे. मात्र इतर ठिकाणी वेगळे नियम आणि अकलूज साठी मात्र भलतेच नियम. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे

.त्यामुळे अकलूज नगरपरिषद झाल्याने अकलूज मधील नागरिकांना नेमका काय फायदा झाला. याबाबत नागरिकांमधून तर्क -वितर्क लढविले जात आहेत.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
अकलूजच्या बाजारपेठेत डाळींबाला चांगला दर मिळू लागल्यामुळे शेतकऱी वर्गातून आनंदाचे वातावरण.*अकलूजच्या मार्केटत डाळींब दराची किमया न्यारी.बादशहाचा सत्कार करी सर्व  शेतकरी.

अकलूजच्या बाजारपेठेत डाळींबाला चांगला दर मिळू लागल्यामुळे शेतकऱी वर्गातून आनंदाचे वातावरण.*अकलूजच्या मार्केटत डाळींब दराची किमया न्यारी.बादशहाचा सत्कार करी सर्व शेतकरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In