*सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सामंजस्य करार व इंडक्शन प्रोग्राम संपन्न*
अकलूज. ता. २२ : येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर -अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि.२२/०९/२०२३ रोजी इन्स्टिटयूट आणि टेस्टबुक एज्यु. सोल्यु. प्रा. लि . नवी मुंबई यांच्यामध्ये सामंजस्य करार इंडक्शन प्रोग्राम संपन्न झाला. यावेळी टेस्टबुक एज्यु. सोल्यु. प्रा. लि . नवी मुंबई चे महाविद्यालयीन समन्वयक श्री. मंगेश कोल्हे, श्री. पारिजात कुलकर्णी , कु. निकिता बडोदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सचिन पांढरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते. यावेळी टेस्टबुक एज्यु. सोल्यु. प्रा. लि . नवी मुंबई चे महाविद्यालयीन समन्वयक श्री. मंगेश कोल्हे यांनी विध्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी इंडक्शन प्रोग्राम चा फायदा मुलांच्या प्लेसमेंट साठी होईल व उद्योजकता विकास याबाबतची कार्यशाळा लवकरच घेण्यात येईल अशी माहिती दिली.या कार्यक्रमामध्ये श्री. पारिजात कुलकर्णी व कु. निकिता बडोदे यांनी मुलांना कॅम्पस इंटरव्ह्यूव टेक्निक , ऍप्टिट्यूड टेस्ट आणि ग्रुप डिस्कशन संदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. राजेश्वर पोटे व प्रा. रुपाली शिंदे-सूर्यवंशी यांनी काम पाहिले.







