अकलूज आगारात चालक दिन साजरा
अकलूज (प्रतिनिधी )सार्वजनिक परिवहन संस्थेच्या कोणत्याही चालकांच्या मध्ये महाराष्ट्राच्या एसटीचे चालक हे अतिशय शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि प्रशिक्षित असल्याने ते देशात अव्वल ठरतात. असे प्रतिपादन अकलूज आगार चे व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांनी केले.
17 सप्टेंबर रोजी वाहन चालकांच्या गौरवार्थ वाहन चालक दिन साजरा करण्यात आला. त्यानुसार एसटीच्या चालकांना गुलाब पुष्प देऊन त्यांची आपल्या कर्तव्याप्रती असलेला कटिबद्धता लक्षात घेऊन, गौरव करण्यात आला. यावेळी कामगिरीवर जाणाऱ्या चालकांना गुलाब देऊन त्यांचा सन्मान केला.
अकलूज आगारातून नियमितपणे 360फेऱ्या होतात. अकलूज आगारात एकूण 120चालक आहेत.
या कर्मचाऱ्यांना सेवेबद्दल वेळोवेळी प्रोत्साहित केले जाते. तसेच विशिष्ट कालावधीनंतर त्यांचे समुपदेशन व प्रशिक्षण आयोजित केल्यामुळे त्यांच्या वाहन चालन पद्धतीमध्ये दिवसेंदिवस अमुलाग्र बदल घडून येत आहे. याचा परिणाम म्हणून एसटीच्या अपघातांची संख्या इतर कोणत्याही परिवहन संस्थेपेक्षा अतिशय कमी आहे. सुरक्षित वाहन चालवण्याचे कौशल्य एसटीच्या चालकांनी आत्मसात केल्यामुळे कोट्यावधी प्रवाशांना सुरक्षित प्रवास करण्याचे अभिवचन एसटीने वेळोवेळी दिली आहे. दळण वळण व वाहतूक क्षेत्रातील चालक हा महत्वाचा घटक असल्याने अकलूज येथील एस टी बस स्थानक मध्ये चालक दीन म्हणून साजरा करण्यात आला.
तसेच यांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या दिनाचे औचित्य साधून अकलूज आगार परिसरातील स्वच्छता देखील केली यावेळी चालक वर्ग उपस्थित होता.













