धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून माजी सरपंच बाबुराव पताळे यांच्या तब्येतीची विचारपूस
खंडाळी (वार्ताहर )खंडाळी (ता. माळशिरस) येथील माजी सरपंच बाबुराव पताळे यांच्या गुढघ्यावर नुकतीच पुणे येथील नामांकित हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट दिली. यावेळी माजी तंटामुक्ती समितचे अध्यक्ष गणपत पताळे, गणेश भोसले, अशोक पताळे,राहूल मगर, मारुती अवघडे,जगन शिंदे,अमोल पताळे आदी उपस्थित होते.






