अकलूज शहर भाजपा यांच्या वतीने 100महिलांसाठी मोफत तिरुपती बालाजी देवदर्शन चे आयोजन
अकलूज (प्रतिनिधी )श्रावण महिना निमित्त अकलूज आणि परिसरातील महिलांना देवदर्शन व्हावे म्हणून भाजपा अकलूज शहर यांच्या वतीने .11/9/2023 रोजी तिरुपती बालाजी देवदर्शनासाठी मोफत 100 महिला प्रवासी व सोबतीला 20 मार्गदर्शक असे 120 प्रवाशी यांच्या साठी मोफत देवदर्शन चे आयोजन करण्यात आले.11सप्टेंबर रोजी सकाळी 8वाजता अकलूज चे ग्रामदैवत अकलाई देवी मंदिर येथून मार्गस्थ झाले.माळशिरस चे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला.यावेळी अकलूज चे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, भाजपा किसान मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भाजप अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबू,भाजप OBC मोर्चा जिल्हाध्यक्ष .बाळासाहेब वावरे,भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपान काका नारनवर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिन शिंदे,भाजपा अकलूज शहराध्यक्ष महादेव भाऊ कावळे,भाजपा युवा मोर्चा डॉ.अक्षय वाईकर,भाजप अकलूज चिटणीस शेखर माने.भाजप माळशिरस उपाध्यक्ष बलभीम दादा जाधव,सुयोग खंडागळे,मनोज साळुंखे,भय्या चंदनशिवे,सुहास गायकवाड,राहुल गायकवाड,सागर थोरात,अण्णा होनमाणे,सागर राजमाने,योगेश मिसाळ, चंद्रकांत धुमाळ व इतर मित्रपरिवार उपस्थित होते.









