अकलूज नगरपरिषद चे माजी अधिक्षक माणिक इंगोले यांचे निधन
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज नगरपरिषद चे माजी अधिक्षक, मध्यवर्ती मंडळाचे सचिव कै.माणिक इंगोले (तात्या) यांचे अल्प:शा आजाराने दिनांक ११/०९/२०२३ रोजी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी संध्याकाळी 10.30 वाजता अकलाई स्मशान भूमी येथे होणार आहे.त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले, एक सून, नातू असा परिवार आहे.ते अत्यंत मनमिळाऊ व धार्मिक स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.






