अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये डाळिंबास मिळाला उच्चांकी २००/_₹ रुपये दर..
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीकडे असणाऱ्या डाळिंब मार्केटमध्ये शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळत असून आज माढा तालुक्यातील गारअकोले येथील शेतकरी संतोष केचे यांच्या भगव्या जातीच्या डाळिंबास येथील प्रसिद्ध आडतदार, व्यापारी राजू भाई व इमरान भाई यांच्या मोहम्मद साद आणि कंपनी या फर्म मध्ये प्रति किलो २००/— रुपये भाव मिळाला आहे वरिष्ठ पातळीवर डाळिंबाची वाढती मागणी लक्षात घेता यापुढे डाळिंबास चांगला भाव मिळेल येथील डाळिंब मार्केटमध्ये जवळपासच्या माण, इंदापूर ,सांगोला, पंढरपूर, माढा या तालुक्यातील जवळपासच्या भागातून विक्रीसाठी डाळिंब मोठ्या प्रमाणात येऊन आवक वाढत आहे डाळिंबास चांगला दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात आनंद व विश्र्वास वाढला आहे.शेतकरी वर्ग शेतातून डाळिंब विक्री न करता अकलूज बाजार समितीच्या डाळींब मार्केट मध्ये विक्री साठी आणणे पसंत करीत आहे डाळिंब खरेदी करण्यामध्ये सादिक भाई ,खंडू नाना, निजामभाई, बालाजी इंगळे, राजू भाई एम एम, इमरान भाई, बालाजी इंगळे भाऊसाहेब घाडगे, अमीर भाई, युसुफ भाई मुन्ना चौधरी ,अक्षय सोनवणे, सागर नागणे, नागेश केदार, कोकरे व अन्य व्यापारी व आडतदारांत माल वाढीव दराने खरेदी करण्यात चुरस निर्माण झाली आहे शेतकऱ्याच्या मालाला नेहमीच चांगला दर व अन्य सुविधा देण्यामध्ये नेहमीच बाजार समितीचे सभापती श्री.मदनसिंह मोहिते पाटील सर्व संचालक मंडळ सचिव श्री राजेंद्र काकडे व अन्य कर्मचारी वर्ग दक्ष व अग्रेसर असतात . माजी उपमुख्यमंत्री मा. विजयसिंह मोहिते पाटील मा.जयसिंह मोहिते पाटील मा. आ. रणजीत सिंह मोहिते पाटील,मा. धैर्यशील मोहिते पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळते अकलूज बाजार समिती मध्ये डाळींबास चांगला दर मिळत असलेमुळे शेतकरी बांधव पुन्हा डाळींब लागवडी कडे वळलेले दिसत आहेत.






