पानीव येथे निषेध मोर्चा शांततेत
पानीव (प्रतिनिधी )जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी झालेल्या मारहाणीत दोषींवर कडक कारवाई करावी व कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण दयावे या मागणीसाठी पुणे पंढरपूर रोडवर पानीव पाटी येथे माळशिरस पंचायत समितीच्या माजी सदस्य सौ. श्रीलेखा प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच करण प्रकाश पाटील व ऍड. अभिषेक प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांततेच्या मार्गाने चक्का जाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनास शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर, डोंबाळवाडीचे सरपंच ब्रह्मदेव डोंबाळे, खुडूस गावचे माजी सरपंच शहाजी काका ठवरे, पानीव ग्रामपंचायतिच्या सरपंच सौ लता कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य अजय सकट यांच्यासह बहुजन समाजातील लोकांनी विविध संघटनांनी पाठिंबा दिला.






