संग्रामनगर ग्रामपंचायत हद्दीत तीन दिवसातून एकदा पाणीपुरवठा होणार
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील संग्रामनगर परिसरातील सर्व नागरीकांना अकलूज नगरपरिषद चे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी आवाहन केले असून,चालू वर्षी पाऊसाने ओढ दिल्याने व पाणी मागणी मोठ्याप्रमाणावर वाढली असल्यामुळे अकलूज नगरपरिषद साठवण तलावात पाटबंधारे विभागाकडून पाणी उशिरा मिळणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा पुढील पाणी साठवण तलावात मिळेपर्यंत पुरवायचे आहे. तरी मंगळवार दिनांक २९-०८-२०२३ पासुन तीन दिवसाआड एक वेळ सकाळी नियमित वेळे प्रमाणे पाणी पुरवठा केला जाईल. तसेच उपलब्ध पाणी काटकसरीने वापरुन नगरपरिषदेस सहकार्य करावे.असे आवाहन अकलूज नगरपरिषद चे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले आहे.






