इंदापूर आगाराची बस लोकल सेवा इंदापूर ते टेंभुर्णी चालु करण्याबाबत अखिल भारतीय मराठा सेवा संघ यांचे वतीने इंदापूर आगार ला निवेदन
अकलूज (प्रतिनिधी )इंदापूर आगाराची बस लोकल सेवा इंदापूर ते टेंभुर्णी चालु करण्याबाबत अखिल भारतीय मराठा सेवा संघ चे प्रदेश उपाध्यक्ष पवनराजे घोगरे -पाटील, जिल्हाध्यक्ष प्रवीण पवार व सहकारी यांनी रा. प आगार इंदापूर यांना निवेदन दिले आहे.निवेदनात असे सांगितले आहे की, सरडेवाडी, बाभुळगांव, हिंगणगाव, कांदलगांव, भिमानगर, आढेगांव पाटी, शिराळ पाटी, टेंभुर्णी या ठिकानावरून अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी हे रोज शालेय शिक्षणासाठी इंदापूरमध्ये येत असतात. पण गेल्या दोन वर्षापासून इंदापूर आगाराची सहल (लोकल) गाडी बंद झाली आहे. त्यामुळे सेवा नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहत आहेत. तसेच खाजगी वाहनातून प्रवास करत असताना वाहनांना मोठे अपघात होत आहेत. विशेष करून एस.टी. सेवा सुरू नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त त्रास होत आहे. विद्यार्थीनींबरोबर अनुचित प्रकार घडत आहेत.त्यामुळे त्यांना खुप मानसिक त्रास होत आहे. तसेच वरील ठिकाणावरील विद्यार्थ्यांच्या पालकांनी अनेक वेळा बस सेवा सुरू करणेचा प्रयत्न केला तरीदेखील बस चालु झाली नाही.,त्यामुळे सदर बस सेवा तात्काळ सेवा सुरू करावी अन्यथा आम्ही लोकशाहीच्या पध्दतीने तीव्र आंदोलन करू याची सर्वस्व जबाबदारी आपलेवर राहिल.असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी पवनराजे घोगरे,प्रवीण पवार,बंडू ननवरे,सचिन सावंत,प्राची सुरेश जाधव,अमृता विठ्ठल कवडे आदी उपस्थित होते.






