श्रावण मास दुर्गाष्टमी निमित्त अकलाई देवी मंदिर यांचे वतीने 22ऑगस्ट रोजी कलश फेरी ग्रंथ दिंडी उत्सव मूर्ती मिरवणूक, पारायण चे आयोजन

अकलूज (प्रतिनिधी )श्रावण मास दुर्गाष्टमी निमित्त अकलूज चे ग्रामदैवत अकलाई देवी ची मंगळवार २२ ऑगस्ट रोजी पहाटे महापूजा होणार असून, सकाळी ७ वा. श्री अकलाईदेवी मंदिरापासून कलश फेरी ग्रंथ दिंडी उत्सव मूर्ती मिरवणूक निघणार आहे.अकलाई मंदिर पासून ही मिरवणूक निघणार असून, रामायण चौक, जुनी ग्रामपंचायत, दत्त चौक, अकलूज नगरपरिषद, गणपती मंदिर काझी गल्ली, शनी मंदिर ते अकलाई मंदिर असा मिरवणूकीचा मार्ग राहणार आहे.सकाळी ७ ते ८:३० पर्यंत मिरवणूक राहील.त्यानंतर ग्रंथ पारायण वाचन ९ वा सुरू होईल व देवीस कुंकुमार्चन होईल.पारायण वाचन साठी 311महिला सहभागी होणार आहेत.
तरी अकलूज परिसरातील सर्व महिला भक्तांनी वेळेवर उपस्थितीत रहावे. असे आवाहन अकलाई देवी देवस्थान चे कार्यकारी विश्वस्त जयसिंह (बाळदादा )मोहिते पाटील यांनी केले आहे.
सदर कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अकलाई देवीचे पुजारीनंदकुमार केशव गुरव, मोहन केशव गुरव, मदन केशव गुरव, अभिषेक गुरव, अनिकेत गुरव, अक्षय गुरव, अनिरुद्ध गुरव, अद्वैत गुरव,हे परिश्रम घेत आहेत.






