गिरझणी पाझर तलाव भरून सांडव्याव्दारे बागेचीवाडी ओढ्याला पाणी सोडावे. रणजितदादा गायकवाड
सध्या पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरीही राज्यातील काही भाग अजुनही तहानलेलाच आहे त्याउलट धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस चालू आहे त्यामुळे तेथील धरणसाखळीत पाण्याची पातळी सामाधानकारक वाढली आहे अजूनही पाऊस चालू असल्याने भविष्यात पुरस्थीती उद्भऊ नये ह्यासाठी धरणांमधून नदी कालव्याद्वारे पाणी सोडण्याच नियोजन सुरू आहे सदर पाणी सोडताना नदीतून पाणी सोडण्याऐवजी कालव्याद्वारे पाणी सोडून ज्या भागात अद्यापही पाउस झालाच नाही ह्या भागातील लहान मोठे पाझरतलाव तलाव भरून घ्यावेत तसेच त्या तलावाच्या लाभक्षेत्रातील ओढ्या नाल्यात पाणी सोडून शेतीसाठी पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा त्यासाठीच विर धरणांमधून उजव्या कालव्यातून पाणी सोडून गिरझणी पाझर तलाव भरून घेऊन सांडव्यातून बागेचीवाडी ओढ्याला पाणी सोडावे अशी मागणी रणजितदादा गायकवाड यांनी केली आहे गिरझणी तलावाच्या पाण्यावर फक्त गिरझणीच नाही तर बागेचीवाडी आनंदनगर कोंडबावी संग्राम नगर परीसरात शेती अवलंबून आहे सध्या पाऊसच पडला नसल्यामुळे या परिसरातील पाणीपातळी खालावली आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे ऐन पावसाळ्यात टॅन्करव्दारे पाणी पुरवठा करावा लागतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे पाटबंधारे विभागाने लवकर निर्णय घेऊन गिरझणी तलावात पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे त्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्रीमहोदय यांना संम्पर्क करण्यात आला आहे आसे रणजितदादा गायकवाड यांनी सांगितले







