वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर मंदीर सर्व्हेक्षण विद्यापीठाच्या आर्कीयोलॅाजी विभागाच्या मार्फत करण्याची मागणी सोलापूर विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य सुरज मस्के यांनी कुलगुरु मओहओदय यांच्याकडे केली आहे. सदर मंदीर हे पुरातन असुन हे मंदीर १९६८ साली पुरातत्व विभाग भारत सरकार यांच्या ताब्यात गेले त्या काळापासुन या मंदिराचा जिर्णोद्धार व दुरुस्ती झालेली नाही या संदर्भात देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मा श्री अमृतराज माने देशमुख यांनी मंदीर सर्वेक्षण ची मागणी श्री सुरज मस्के यांच्या कडे केली होती त्या पार्श्वभूमीवर सिनेट सदस्य मस्के यांनी कुलगुरु महोदय यांना या संबंधीचे निवेदन दिले यावर कुलगुरु महोदय यांनी लवकरच सर्वेक्षण सुरु करुन अहवाल शासनाला पाठवण्याचे आश्वासन दिले आहे या अहवालाच्या माध्यमातून मंदीर जिर्णोद्धार साठी लवकरच निधी उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे







