अकलूज दर्गाह मस्जिदचे अध्यक्ष अलहाज हाजी हारूनभाई अहमदभाई तांबोळी यांचे निधन
.अकलूज प्रतिनिधी अकलूज येथील दर्गाह मस्जिदचे अध्यक्ष अलहाज हाजी हारूनभाई अहमदभाई तांबोळी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ६१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. अझहर तांबोळी, हाजी हुमायुन तांबोळी, शाहरुख तांबोळी यांचे ते वडील होते. तर पत्रकार शौकत तांबोळी यांचे थोरले बंधू होते.






