*जिंकू किंवा हारू*
सत्ते पायी कायपण आम्ही करू
कायपण आम्ही करू !
जिंकू किंवा हारू,
जिंकू किंवा हारु
विरोधकांच्या चिन्हासंगे युती आम्ही करू
,युती आम्ही करू
जातीभेदास खतपाणी देऊ
कार्यकर्त्यांना आपसात भिडवू
समस्यांकडे पाठ अशी फिरवू
घोटाळे एकमेकांचे आपणच लपवू
तिजोरी आपली भरू
सत्तेपायी कायपण आम्ही करू
कायपण आम्ही करू
जिंकू किंवा हारु
जिंकू किंवा हारु
जनतेस टोपी घालू
टोपी फिरवू
स्वतःचेच हित पहात राहू
राजकारण ऐसे करू
वाळवी बनू देशास
पोखरूखोके,ओके,गद्दार बनूतत्व,नीतिमत्ता सारे विसरू
सत्तेपायी कायपण आम्ही करू
कायपण आम्ही करू
.जिंकू किंवा हारु,
जिंकू किंवा हारु .
कवियत्री *नूरजहाँ फाकृद्दीन शेख* गणेशगाव ता.माळशिरस जि.सोलापूर






