*सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदी तानाजी वायदंडे तर माळशिरस तालुका उपाध्यक्ष पदी विष्णू केंगार*
अकलूज (प्रतिनिधी )सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या नवीन पदाधिकारी व सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या.माळशिरस तालुका अध्यक्ष पदी तानाजी वायदंडे तर माळशिरस तालुका उपाध्यक्ष पदी विष्णू केंगार व सदस्य पदी सुर्यकांत व्हनवार, संजय मिसाळ,अजिनाथ आवळे, अर्जुन मिसाळ,काका आवळे,किसण केंगार, लालासो मिसाळ ,अर्जुन मदणे,राजु वायदंडे,यांची निवड करण्यात आली.या निवडी राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे व राष्ट्रीय उपध्यक्ष तेजस परमार व पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांच्या अध्यक्षतेखाली कारण्यात आल्या. यावेळी नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी सांगितले की सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे काम व विचार आम्ही माळशिरस तालुक्यातील वाड्या वस्तीवरील पोहोचवू.या कार्यक्रमाला पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने, अकलूज शहर अध्यक्ष समर कोतमिरे, अकलूज उपाध्यक्ष अभिषेक चाबुकस्वार, संग्राम नगर शहर अध्यक्ष रोहित टेके, नवनाथ केंगार,महेश लोखंडे,माळशिरस तालुका महिला अध्यक्ष अश्विनी पाढंरे,माढा तालुका महिला अध्यक्ष वनिता वजाळे,पुणे जिल्हा महिला अध्यक्ष शुभांगी मोरे, माळशिरस तालुका सरचिटणीस वंदना तिकोटे, उपस्थित होते.






