विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी शक्ती साधना केंद्र अकलूजचे उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न
विश्व हिंदू परिषद ही संघटना स्थापनेपासून विविध आयामाच्या माध्यमातून राष्ट्राच्या व धर्माच्या प्रगतीसाठी कार्य करत आहे अशाच दुर्गा वाहिनी च्या माध्यमातून अकलूज या ठिकाणी दिनांक १६/०७/२०२३ रोजी शक्ती साधना केंद्राची स्थापना करण्यात आली याच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे भाजपचे सोलापूर जिल्हा संघटन मंत्री श्री धैर्यशील जी मोहिते – पाटील, प्रमुख वक्ते म्हणून इचलकरंजी बजरंगदल जिल्हा संयोजक अमित जी कुंभार, जिल्हा मंत्री रामेश्वर कोरे, मातृशक्ती जिल्हा संयोजिका सै.रश्मी पुंज, दुर्गा वहिनी जिल्हा संयोजिका कु.गायत्री देशपांडेइत्यादी मान्यवर उपस्थित होते
यावेळी दुर्गानि शस्त्रपूजन व दीप प्रज्वलन करून कार्येक्रमाची सुरवात केली. शक्ती साधना केंद्राच्या माध्यमातून अकलूज मधील मुलींना आत्मसरंक्षण साठी दिनांक २३/७/२०२३ म्हणून प्रत्येक रविवारी सायं ४ :०० ते ६:०० या वेळेत लाठी काठी व तलवारबाजीचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे तरी यामध्ये जास्तीत जास्त मुलींनी सहभाग घ्यावा असे आव्हान करण्यात आले
.हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कीर्ती ताई कुलकर्णी, अजित जी कासेगावकर, अमित जी एकतपुरे, विशाल जी कुंभार, हितेश पुंज ,दिपराज माने देशमुख, विकास काटकर,अमित पुंज इत्यादी सर्व स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले









