अकलूज आगार यांच्या वतीने अकलूज बस स्थानक येथे आरोग्य शिबीर संपन्न
अकलूज (प्रतिनिधी )13 जुलै रोजी अकलूज बस स्थानक येथे अकलूज आगारातर्फे मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते . दुपारी 1 ते 3 या दरम्यान हे शिबीर भरवण्यात आले होते. या शिबिरामध्ये दातांची व संपूर्ण आरोग्याची तपासणी करण्यात आली.डॉ. स्वप्निल उत्तम भोसले व डॉ मृणाल स्वप्निल भोसले यांनी बस स्थानकावरील महिला प्रवाशी, वयोवृद्ध प्रवाशी, शालेय विद्यार्थिनी व अकलूज आगारातील चालक, वाहक व प्रशासकीय कर्मचारी असे एकूण 55 जणांची संपूर्ण आरोग्य तपासणी केली व त्यांना त्यांच्या आरोग्याविषयी योग्य ते मार्गदर्शन केले.
सदर शिबिर हे अकलूज आगाराचे आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.सदर शिबीर हे यशस्वीपणे राबविण्यासाठी अकलूज आगारातील वरिष्ठ लिपिक दुपडे उदय, वाहतूक नियंत्रक विजय रंदवे, राजू गोसावी, कांतीलाल मदने, विजय लंगोटे, उत्तम भोसले , शिंदे संतोष यांनी विशेष परिश्रम घेतले.











