व्यसनमुक्त युवक संघ माळशिरस तालुका यांचे वतीने १६ जुलै २०२३ रोजी ज्ञानाई गुरूकुल अकलुज या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन
अकलूज (प्रतिनिधी ) व्यसनमुक्त युवक संघ माळशिरस तालुका यांचे वतीने रविवार १६ जुलै २०२३ रोजी ज्ञानाई गुरूकुल अकलुज या ठिकाणी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक ह.भ.प. युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शन खाली एक दिवसीय संस्कार शिबीरा चे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ९ वा,अल्पोपहार,९.३० वा- उद्घाटन व प्रतिमा पुजन ह.भ.प. युवकमित्र बंडातात्या कराडकर,ह.भ.प. श्री सोहम महाराज मोरे देहुकर (मळोली)श्री जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे.सकाळी १० वा-शालेय जिवनातील नितीमुल्ये या विषयावर सौ सुनीता माने -ठोंबरे शिक्षीका स.मा.वि. अकलुज यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. ११.३० वा-ह.भ.प. युवकमित्र बंडातात्या कराडकर युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.दुपारी १२ ते २ वा-उपस्थिताना भोजन आहे.दुपारी २ ते ३ वा-अध्यात्म व व्यसनमुक्ती या विषयावर ह.भ.प. सुरेश महाराज सुळ(संस्थापक ज्ञानाई गुरुकुल ) यांचे व्याख्यान होणार आहे.दुपारी ३ ते ४ वा-तालुक्यातील स्पर्धापरिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा होणार आहे.
तरी परिसरातील नागरिकांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन विजय पराडे (जिल्हाध्यक्ष सोलापुर)(९८२२३५५७३४),नंदु खंडागळे(९८९०३३४४६८)पोपट जमदाडे(9146206562)ह.भ.प. मंगेश महाराज माने देशमुख(९७३०४०४९६५ )नारायण घाडगे(९७६६२६०३३०) यांनी केले आहे.






