अकलूजच्या कॉलेज ऑफ फार्मसीचे जी पॅट परीक्षेत यश.
संग्रामनगर दि.८ (केदार लोहकरे यांजकडून)
अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या काॅलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.एम.फार्मसी प्रवेशासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील घेतल्या जाणाऱ्या जी पॅट परीक्षेमध्ये महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे.यामध्ये प्रतीक्षा राजगुरू,पूजा माने-देशमुख,प्रणाली नरोटे,राजनंदिनी ताटे व श्रेयश राऊत या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
हे यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील,सचिव अभिजीत रणवरे व सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील,महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.अनिल भानवसे तसेच महाविद्यालय विकास समितीचे सभापती व सर्व सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या
या यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.तसेच या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे.







