*हेमलता रत्नाकर सरताळे याचे निधन.*
संग्रामनगर दि.६ (प्रतिनिधी)माळशिरस पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी हेमलता रत्नाकर सरताळे यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.त्या ७१ वर्षांच्या होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना, जावाई,नातवंडे असा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी लिंगायत स्मशानभूमीत झाला.यावेळी लिंगायत समाजाचे कार्यकर्ते,समाज बांधव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.डाॅ.चंदन सरताळे यांच्या त्या मातोश्री होत्या.






