लोकनेते स्व.प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त अकलूज येथे 6जुलै रोजी ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर )यांचा सुश्राव्य भव्य कीर्तन सोहळा
अकलूज (प्रतिनिधी )लोकनेते स्व.प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त अकलूज येथील विजय चौक येथे 6जुलै रोजी संध्याकाळी समाज प्रबोधनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर )यांचा सुश्राव्य भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला असून,परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन संयोजक महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना, धवलनगर अकलूज यांनी केले आहे.






