गणपती फार्मसीमध्ये वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी मौजे अकोले खुर्द ता. माढा, येथील गणपती फार्मसीमध्ये वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशी निमित्ताने वारीला सुरुवात होते. राज्यातील विविध भागांतून लाखों वारकरी पायी पंढरपूरला हरिभजन करत, विठ्ठल नामाचा जयघोष करत निघातात, लांब पल्याचे अंतर ऊन्हात पावसात पायी पूर्ण करताना वारकऱ्यांना हवामानातील बदलांमुळे होणारे सर्दी, ताप, खोकला, शारीरीक वेदना, थकवा यासारख्या समस्या जानवतात यासाठी वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी टेंभूर्णी येथील गणपती फार्मसी महाविद्यालयाने टेंभूर्णी शहरातील प्राख्यात डॉ. अशोक जाधव व डॉ. सुनिल खराडे यांच्या समवेत गणपती फार्मसी महाविद्यालयात आरोग्य तपासनी व औषधोपचार केंद्र चालवले. या मध्ये महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला व आरोग्य शिबीर यशस्वीरित्या पार पाडले. याच बरोबर टेंभूर्णी प्रथमिक आरोग्य केंद्र व अकोले प्रथमिक आरोग्यकेंद्र मार्फत राबविलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्र यामध्येही महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून वारकऱ्यांची सेवा केली. समाजाच्या निरोगी आरोग्यासाठी फार्मासिस्टची जबाबदारी व आरोग्यसेवेची जान विद्यार्थ्यांना होण्यासाठी महाविदयालयच्या प्राचार्या. डॉ. रूपाली बेंगुडे याच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी काम केल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे यांनी दिली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबासाहेब येडगे, जेष्ठ पत्रकार हरिश्चंद्र गाडेकर व धनंजय भोसले, प्रा. अक्षय भेंकी, प्रा. प्राची पुराणिक, प्रा. प्रजवला खपाले, प्रा. रेणुका शिंदे व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.उपक्रमाचे समन्वयक प्रा. शिवराज ढगे व प्रा. रुपाली राऊत यांनी काम केले.






