आरोग्यदूत आमदार राम सातपुतेव संस्कृतीताई सातपुते यांची आगळीवेगळी वारकरी सेवा
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आ. राम सातपुते हे आरोग्यदूत म्हणून सर्वत्र परिचित आहेत. माळशिरस मतदार संघातील अनेक रुग्णांवर त्यांनी मोफत उपचार उपलब्ध करून दिले आहेत. अनेक गंभीर आजाराच्या रुग्णांवर वेळेत उपचार करून त्यांचे प्राण वाचविले आहेत



.नातेपुते येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात मांडवे (ता. माळशिरस) येथे आ. राम सातपुते व संस्कृती सातपुते या उभयतांनी सोहळ्यातील वैष्णवांची स्वत: हाताने तेल लावून मसाज करून आगळीवेगळी सेवा केली आहे.माऊलींच्या सोहळ्यात वाटेवरील प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार काही तरी सेवा करीत असतात. बहुतांश लोक अन्नदान करण्यास प्राधान्य देतात. मात्र, आ. राम सातपुते व त्यांच्या पत्नी संस्कृतीताई सातपुते यांनी मांडवे येथे निवारा करुन १० हजार वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप केले. त्याचबरोबर पुणे येथील तज्ज्ञ मसाज करणारा ग्रुप बोलावून वारकऱ्यांच्या पायाची मसाज केली. या मसाज पथकात शंभर तरुणांचा सहभाग होता. यावेळी सातपुते दाम्पत्यांनी वारकऱ्यांच्या पायाला तेल लावून मसाज करून सेवा केली.
एव्हडेच नव्हे तर दोघांनी संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पायी चालून सहभाग घेतला.
चौकट :-
पायांनी चालतो तो ‘ प्रवास ‘मनानी चालतो ती ‘ यात्रा ‘आणि …हृदयातून चालते ती ‘ वारी ‘ !
माळशिरस येथे माउलींच्या पालखी सोहळ्यात सेवा करण्याचे भाग्य लाभले . यावेळी अल्पोपहाराचे वाटप केले . निरंतर चालत असलेल्या वारकऱ्यांच्या पायाला तेल मालिश केली . क्षणभरासाठी का होईना त्यांच्या सुजलेल्या-थकलेल्या पायाना आराम दिल्यामुळे आम्हाला व संपूर्ण टीमला मनातून समाधान वाटले.वारीतील महिलांना एक आनंद म्हणून यावेळी त्यांच्या केसांत गजरे माळले .गजरे वाटप केले .
सौ. संस्कृतीताई राम सातपुते.






