*शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये टाळ- मृदंगाच्या साथीने भक्तीमय वातावरणात न्हावून निघाले शाळकरी वारकरी*
अकलूज (प्रतिनिधी )भक्तीच्या वाटेवर विठुरायाच्या आशीर्वादासाठी वारकऱ्यांची पावले आसुसलेली असतात. तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे, ‘पांडुरंगा’, माझ्या माणसांना नेहमीच तुझ्या सहवासात राहू दे! असाच काहीसा संदेश घेऊन ती पंढरीच्या वाटेवर वळलेली असतात.आषाढी एकादशीला जमतात सारे वारकरी, टाळ मृदंगाच्या जयघोषात मग्न होतात शाळकरी, बघून सारे दृश्य मन होते प्रसन्न, जणू स्वर्गच उतरला धरतीवर!भाळी चंदनाचा टिळा लावून मुखी हरिनामाचा जयघोष करत शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल आणि जिल्हा परिषद केंद्र शाळा यशवंत नगर यांच्या सौजन्याने आज पालखी सोहळ्यानिमित्त पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.दिंडीच्या सुरुवातीला पालखीचे पूजन शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल मा श्री. जितेंद्र माने देशमुख आणि जिल्हा परिषद केंद्र शाळा यशवंत नगर चे मुख्याध्यापक श्री. बंडू खडतरे यांच्या हस्ते करून व इ पहिली ते पाचवी च्या विद्यार्थ्यांनी सौ सुवर्णा निंबाळकर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली बसवलेल्या विठ्ठल नामाची शाळा भरली हे नृत्य सादर करून ही दिंडी शाळेतून निघून कीर्तीनगर, यशवंतनगर या भागातून काढण्यात आली. दिंडी दरम्यान शाळेतील पालक श्री पिंटू चौगुले यांनी नऊ वर्षांची परंपरा जपत दोन्ही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची अतिशय उत्तम अशी नाश्त्याची सोय केली. त्याबद्दल दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांकडून त्यांचे आभार मानून त्यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.त्याठिकाणी एकदा मुलांनी विठ्ठल नामाची शाळा भरली हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिकली. त्यानंतर पायी दिंडी शाळेत पोहोचताच शाळेच्या मैदानावर रिंगण सोहळा पार पडला त्यावेळेस विद्यार्थांनी ज्ञानोबा – तुकाराम म्हणत शाळेचे मैदान दणाणून सोडले. रिंगण सोहळ्यानंतर मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बालचमुंनी फुगडीचा आनंद घेतला.अशाप्रकारे टाळ – मृदंगाच्या साथीने शाळेचे सारे क्रीडांगण भक्तीच्या रसात न्हावून निघाले.








