*संत निरंकारी मंडळ ब्रँच अकलूजच्या वतीने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचे स्वागत
* जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. दरवर्षी प्रमाणे संत निरंकारी मंडळाच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत निरंकारी मंडळ झोन सोलापूर यांचे वतीने करण्यात आले. या स्वागत सोहळया बरोबर पालखी बरोबर पायी चालत असणाऱ्या वारकरी बांधवांना सकाळच्या चहा, नाष्टाची सोय करण्यात आली. सकाळी ८.३०वाजता पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय स्वागत झाल्यावर पालखी हळुहळू अकलूजच्या दिशेने प्रस्थान करत असते. तेव्हा थोडे पुढे आल्यावर रस्त्यावरच संत निरंकारी संतसंग भवन आहे. निरंकारी मंडळ ब्रँच अकलूज मधील युनिट ८२५ सेवादल यांना पाहीले की पालखी प्रमुख पालखीचे स्वागत करण्यासाठी पालखी दोन मिनिटे थांबवून निरंकारी मंडळाच्या मान्यवरांच्या हस्ते निरंकारी मिशनचा मानाचा दुप्पटा व हार देऊन जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत केले जाते. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी चे दर्शनासाठी सर्व निरंकारी अनुयायी दर्शनचा लाभ घेतात.यावेळी संत निरंकारी मंडळ झोन सोलापूर ब्रँच-अकलूज येथे पालखी स्वागतासाठी क्षेत्रीय संचालक मा. बाबासाहेब पवारजी, अकलूज युनिट ८२५ संचालक मा. दिलीप कांबळेजी, अकलूज ब्रँच कमेटी सदस्य मा.लालासाहेब अडगळेजी सेवादल शिक्षक मा. अजिंक्य मानेजी, युनिट ८२५ महिला इन्चार्ज सौ. मेघाताई ठोंबर अकलूज ब्रँच – युनिट सर्व सेवादल संगत व प्रचारक उपस्थित होते.












