शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जगद्गुरु तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान.-
-२४ हजार भाकरीचे वाटप तर ९ हजार२०० विद्यार्थ्यांचा सहभाग.-
अकलूज (प्रतिनिधी)येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखेतून जगद्गुरु तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांना सुमारे २४ हजार भाकरी व ११५ किलो बेसनाचे पिठले, ठेचा लोणचे अशा अस्सल ग्रामीण आस्वादाचे अन्नदान करण्यात येणार आहे. यासाठी संस्थेचे ९ हजार२०० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होत आहेत. शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक आदरणीय मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील यांनी संस्थेच्या वतीने वैष्णवांना अन्नदान वाटपाची सुरुवात केली.शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री संग्रामसिंह मोहिते पाटील, सदस्या माननीय कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, सचिव माननीय श्री अभिजीत रणवरे, सहसचिव माननीय श्री हर्षवर्धन खराडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या अन्नदानाचे वाटप होणार आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दि. २४ जुन रोजी अकलूज येथे आगमन होत आहे. पालखीचा आदल्या दिवशीचा मुक्काम सराटी येथे असतो. सराटी व अकलूज हे अंतर केवळ तीन किलोमीटर असल्याने लाखो वैष्णव आदल्या दिवशीच मुक्कामाला अकलूजला येत असतात. आदल्या दिवशी मुक्कामास येणाऱ्या वैष्णवांना अन्नदान व्हावे, त्यांना घरगुती भोजनाचा आस्वाद मिळावा या हेतूने सन २०१५ पासून शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक आदरणीय जयसिंह मोहिते पाटील यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अन्नदान वाटपाला सुरुवात केली. अन्नदान वाटपाचे हे ९ वे वर्ष असून याही वर्षी दि. २३जून रोजी दुपारी साडेतीन वाजता अकलूज- सराटी महामार्गावरील अकलूज हद्दीत शिक्षण प्रसारक मंडळ अन्नदान वाटप करणार आहे. या अन्नदानामध्ये शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहा शाळा सहभागी झाल्या आहेत. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात, महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला शंकरनगर, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला शंकरनगर, महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग शंकरनगर, सदाशिवराव माने विद्यालय अकलूज, जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अकलूज या ६ शाखेतून सुमारे ७ हजार विद्यार्थी अन्नदानात सहभागी होणार आहेत. यामध्ये १५ हजार भाकरी, ७० किलो पिठाचे बेसन पिठलं, ठेचा, लोणचं, कांदा असा ग्रामीण भोजनाचा आस्वाद देत आहेत. सुमारे १० हजार वारकरी या अन्नदानाचा लाभ घेणार आहेत.यावेळी मुख्याध्यापिका सौ सुनिता वाघ,श्री. संजय गळीतकर,प्रा.राहूल सुर्वे,श्री. अमोल फुले, सौ सविता गायकवाड, श्री .शिवाजी पारसे, श्री पोपटराव देठे आदी उपस्थित होते. तसेच संस्थेच्या सदाशिवनगर येथील कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व जुनिअर कॉलेज यांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मांडवे (ओढा) विसावा येथे दिनांक २४ जून रोजी सकाळी ९ वाजता पाच हजार भाकरी व २५ किलो बेसन, ठेचा, लोणचे असे अन्नदान होत असून यामध्ये सुमारे १हजार२०० विद्यार्थी सहभागी होत आहेत. मागील १८ वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. मुख्याध्यापक, प्रशाला समितीचे सर्व सदस्य प्रमुख उपस्थित राहणार आहेत. वेळापूर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय व अर्धनारी नटेश्वर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवासाठी दि.२५ रोजी सकाळी १० वाजता ४ हजार भाकरी, २० किलो बेसन, ठेचा, लोणचं असे अन्नदान होत असून याकरिता १ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. प्रशालेचे सभापती मा.श्री. सतीशराव माने देशमुख, मा.श्री. अमरसिंह माने देशमुख, मुख्याध्यापक श्री. उरणे यावेळी उपस्थित राहणार आहेत. दोन्ही पालखी सोहळ्यात संस्थेच्या वतीने सुमारे २४ हजार भाकरी, १२५ किलो बेसनचे पिठले, ठेचा, भाकरी ,लोणचे असे अस्सल ग्रामीण अन्नदान करण्यात येणार असून यासाठी ९ हजार२०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.






