शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
प्रतिनिधी ; ‘तन, मन, आत्मा आणि बुद्धी यांची सांगड घालण्यासाठी नियमित योगा करण्याचा निर्धार करून निरोगी आयुष्याचा मंत्र जपूया’ असा संदेश घेऊन शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शिवरत्न सेमी इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये योगा दिवस अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.योगाचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी महर्षी प्रशाला – यशवंतनगर येथे व्यवसाय विभागामध्ये कार्यरत असलेले योगशिक्षक धनंजय देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक जितेंद्र माने देशमुख यांचे शुभहस्ते करण्यात आला. प्रशालेतील शिक्षिका शिल्पा जाधव यांनी योगाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व पटवून दिले.तन आणि मनाचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग होय. योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नसून मानसिक स्वास्थ्य, भावनिक समतोल राखणारे एक शस्त्र आहे. योगासने दीर्घकाळ फायदा देतात म्हणून आपण योगाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने योग दिवस साजरा केला असे म्हणता येईल. मुलांनी अतिशय उत्साही आणि मनोरंजन पर वातावरणात योगाची प्रात्यक्षिके केली. योगासने करत असताना सरांनी विद्यार्थ्यांना चुकीच्या आहार पद्धती तसेच नियमित योगासने करण्याचे फायदे अतिशय गमतीदार उदाहरणावरून पटवून दिले आणि योग दिनाच्या निमित्ताने मुलांकडून काही संकल्पही करून घेतले. आणि नियमित योगासने करण्याचे आश्वासनही मुलांकडून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षिका सुवर्णा निंबाळकर यांनी तर आभार प्रदर्शन अनुष्का बर्गे यांनी केले.जनसंपर्क विभाग शिवरत्न शिक्षण संस्था






