शिवरत्न नाॅलेज सिटीत जागतिक योगदिन उत्साहात साजरा
अकलूज: येथील शिवरत्न नाॅलेज सिटी परिसरात विजयसिंह मोहिते पाटील काॅलेज ऑफ नर्सिंग ॲन्ड मेडिकल रिसर्च व शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ग्रीनफिंगर्स काॅलेज ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी व शिवरत्न शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. नाॅलेज सिटी परिसरातील ऑडिटोरियममध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमात क्रीडा संचालक डॉ. महेश ढेंबरे यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना योगाचे प्रशिक्षण दिले. भारताकडून समस्त जगाला महत्व पटवून देणारा योग किती महत्वाचे आहे हे आपल्या प्रास्ताविकातून बीबीए महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार यांनी मांडले.या वेळी विद्यार्थी, शिक्षक ,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जनसंपर्क विभाग शिवरत्न शिक्षण संस्था शिव-पार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट.






