*जिजामाता कन्या प्रशालेतील मुलींचे स्वागत हलगीच्या कडकडाट करण्यात आले.*
संग्रामनगर दि.१६ (केदार लोहकरे यांजकडून)अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या जिजामाता कन्या प्रशालेत आज नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी मधील मुलींचे स्वागत मुख्याध्यापिका सौ.सुनिता वाघ व पर्यवेक्षक यशवंत माने-देशमुख यांचे हस्ते गुलाबपुष्प व चाॅकलेट देऊन करण्यात आले.गेल्या दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर आज मुलींचा शाळेचा पहिलाच दिवस होता. नवीन शाळा…नवीन प्रवेश…शाळेचा पहिला दिवस… त्यामुळे मुलींच्या चहे-यांवर आज वेगळाच उत्साह,आनंद व कुतूहल दिसत होते.आज मुलींचे प्रशालेत आगमन झाले त्याप्रसंगी त्यांचे हलगीच्या कडकडाटात प्रशालेच्या प्रवेश दारातच मुलींचे स्वागत करत गुलाब पुष्प व चाॅकलेट देऊन त्यांची मिरवणूक काढून मुलींना प्रशालेच्या इमारतीत घेऊन गेले. शाळेच्या पहिल्याच दिवशी ५ वी ते ८ वी च्या सर्व विद्यार्थिनींना नवीन पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले.आज आपल्या पाल्याचा शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे मुलींबरोबर पालकांची गर्दी खूप केली होती.










