वयोवृद्ध रेशन धारकाचे बायोमेट्रिक होत नसल्याकारणाने त्यावर पर्यायी मार्ग काढा – महेश शिंदे
जिल्हाधिकारी सोलापूर यांना मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन
शासनाने स्वस्त धान्य दुकानात असलेल्या बायोमेट्रिक प्रणालीवर ‘अंगठा लावा आणि धान्य मिळवा’ असा उपक्रम सुरू केला आहे.रेशन माफियांचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी हा उपक्रम आपण चालू केला असून याचा लाभ अनेक रेशन धारकांना होत आहे.परंतु असंख्य रेशन धारक हे वयोवृद्ध असल्याकारणाने त्यांचे बायोमेट्रिक होत नाही. असे अनेक वयोवृद्ध रेशन धारक आहे त्याच्या घरात कोणीच नाही त्यामुळे त्यांचे उपजीविका भरण्यासाठी आपण शासनाच्या माध्यमातून त्यांना रेशन दिले जाते परंतु बायोमेट्रिक होत नसल्याकारणाने त्यांना आपल्या रेशन द्वारे मिळणाऱ्या उपजीविकेपासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे अशा लोकांना वंचित न ठेवता त्यांना तालुक्यातील सक्षम अधिकारी यांनी म्हणजेच तहसीलदार साहेब,तालुका पुरवठा अधिकारी, मंडलाधिकारी साहेब किंवा तलाठी साहेब यापैकी एखाद्या साहेबांनी चलन पावतीवर त्यांना रेशन देण्याची व्यवस्था करावी. तसेच संबंधित सक्षम अधिकारी यांनी रेशन दुकानदारला असे आदेश देण्यात यावेत याकरिता निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य वतीने निवेदन देण्यात व 10 जुलै रोजी बेमुदत धरणे आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला यावेळी मैत्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे व तालुका उपाध्यक्ष शंकर मस्के आदी उपस्थित होते.






