*नातेपुते येथे अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने समाजातील बुद्धीजीवी वर्गाचा सन्मान सोहळा व कार्यकर्ता प्रबोधन शिबीराचे आयोजन-
नातेपुते(प्रतिनिधी)
अखिल भारतीय होलार समाज संघटना माळशिरस तालुक्याच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा फुले,विश्वरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज ,भगवान गौतम बुध्द व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे संयुक्त जयंती निमित्त व जनकल्याणकारी लोकराजा छत्रपती शाहु महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त “महामानवांना अभिवादन सोहळा”,समाजातील बुध्दीजीवी वर्गाचा सन्मान सोहळा व कार्यकर्ता प्रबोधन शिबीर आयोजित केले आहे या कार्यक्रमाचे उदघाटक व विशेष अतिथी मा रणजितसिंह मोहीते पाटील(आमदार विधानपरिषद महाराष्ट्र राज्य ),प्रमुख वक्ते मा लक्ष्मणराव ढोबळे (माजी मंत्री,महाराष्ट्र राज्य )प्रमुख मार्गदर्शक मा ॲड किरण जावीर(राष्ट्रीय नेते)मा ज्ञानदेव जावीर(राष्ट्रीय अध्यक्ष )मा एस के आयवळे(महाराष्ट्राचे प्रमुख मार्गदर्शक )तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा नंदकुमार केंगार साहेब (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष)कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मा किसन ढोबळे,मा घनश्याम ढोबळे,निमंत्रक-सुनिल ढोबळे तसेच प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.हे कार्यकर्ता प्रबोधन शिबीर शनिवार दिनांक ६/५/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता स्थळ-अहिल्यादेवी होळकर सभागृह नगरपंचायत नातेपुते या ठिकाणी होणार आहे.व्यवस्थापक – अखिल भारतीय होलार समाज संघटना शहर शाखा नातेपुते हे करणार आहेत .सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान नातेपुते शहर अध्यक्ष गणेश जाधव व मा ता उपाध्यक्ष शंकर ढोबळे यांनी केले .*






