माळशिरस तालुक्यात अनुसूचीत जातींना हक्कापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे- लालासाहेब अडगळे
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ग्रामपंचायत अनुसुचित जाती-जमाती मतदार संघातून राष्ट्रवादीचे उत्तम जानकर निवडून आले वास्तविक पहाता उत्तम जानकर हे धनगर समाजाचे नेते म्हणून अख्या महाराष्ट्रातील धनगर समाजाला माहीत आहेत. परंतू ते जाणीवपूर्वक अनुसूचित जातींच्या हक्काच्या असणार्या राखीव जागा हडपत आहेत. त्याचे जातचोरी प्रकरण सद्या न्यायालयात प्रलंबित बाब आहे. तरी ही या माळशिरस तालुक्यातील अनुसूचीत जातींना मिळणारे हक्क असे राजरोज पणे चोरले जात आहेत. पैशाच्या जोरावर माणसे विकत घेतली जात आहेत. जे खरे लाभार्थी आहेत. त्यांना मिळणार्या हक्का पासून ते कोसोदूर फेकले जात आहेत. उत्तम जानकर यांनी आमच्या हक्क वरती जाणीवपूर्वक डोळा ठेवलेला आहे. धनगर समाजासाठी महाराष्ट्र भर दौरे करून आंदोलने, उपोषणे करुन धनगर समाजांच्या तरुणांना भडकवण्याचे काम करणारे उत्तम जानकर आपण भविष्यात आमच्या अनुसूचित जातींना मिळणारे लाभ असेच पैशांच्या जोरावर चोरणार असाल तर येणार्या काळात आपणांस योग्य परिणाम भोगावे लागतील यात शंका नाही. उत्तम जानकर यांचे बरोबर माळशिरस तालुक्यातील इतर नेते मंडळी ही त्यांना साथ देत आहेत. माळशिरस तालुक्यात आपणा सर्वाना अनुसूचित जातीचे ऐवढे पित्त झाले आहे का? आमच्या हक्काच्या जागा आपण सर्वजन उत्तम जानकार यांच्या घशात घालत आहात. अनुसूचित जातींची आपल्याला गरज नसल्यासारखे आपण सर्व नेते मंडळी वागत आहात याचे परिणाम आपणांस ही भोगावेच लागतील. असेच अनुसूचित जातींचे आपण शोषण करणार असाल तर भविष्यात आपल्याला याचे परिणाम पाहायला मिळतीलच.






