अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ९६.५७ टक्के मतदान.29एप्रिल ला अकलूज येथे मतमोजणी अकलूज (प्रतिनिधी )अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या 2023-2028 निवडणूकिसाठी अत्यंत चुरशीने व शांततेत ९६.५७ टक्के विक्रमी मतदान झाले . अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील विरूद्ध विरोधक अशा दोन पॅनलमध्ये दुरंगी लढत होती. या निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी माळशिरस तालुक्यातील अकलूज, नातेपुते, महाळूंग व पिलीव या पाच ठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शुक्रवारी २८एप्रिल रोजी सकाळी आठ वाजल्यापासून चालू झाली. सकाळी आठ ते दहा दरम्यान मतदारांचा प्रतिसाद कमी होता.परंतु,दहा ते बाराच्या टप्प्यात मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. या निवडणुकीतील सर्वसाधारण मतदारसंघातील सोसायटी गटातून १८२३ पैकी १७७६ जणांनी मतदान केले. या मतदार संघात ९७.४२ टक्के मतदान झाले. ग्रामपंचायत गटात ११५१ पैकी ११३२ (९८.३५ टक्के) ; व्यापारी गटासाठी ४११ पैकी ३६९ (८९.७८ टक्के) व हमाल तोलारी मतदार संघासाठी २०३ पैकी १८८ (९२.६१ टक्के) असे एकूण ३५८८ पैकी ३४६५ मतदान झाले आहे. मतमोजणी शनिवार (ता.२९) रोजी अकलूज येथे होणार आहे.दरम्यान दोन्ही गटाकडून आपलाच विजय होणार. असे सांगितले जात आहे.29एप्रिल रोजी दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार असून, सत्ताधारी गट आपली सत्ता अबाधित राखणार की विरोधक चंचु प्रवेश करणार हे मात्र 29एप्रिल लाच समजेल.







