विनापरवाना झाडे तोडणा-यावर अकलूज नगरपरिषदेने उगारला कारवाई चा बडगा
अकलूज (प्रतिनिधी ) 26/04/2023 रोजी अकलूज औदुंबरनगर येथील ज्ञानदेव नारायण हिवरकर यांनी स्व:ताचे मालकीचे जागेतील काशिद जातीची 30 फूटी एकूण 14 झाडे अकलूज नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता तोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांचे मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे वृक्ष अधिकारी नरेंद्र पाटोळे यांनी अकलूज पोलीस स्टेशन मध्ये रितसर तक्रार देवून सदरची झाडे तोडणारे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला.वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत असल्याकारणाने जागतीक तापमान वाढताना दिसत आहे. येत्या पावसाळ्यात प्रत्येक कूटूंबाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे तसेच विनापरवाना वृक्षतोड करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे अवाहन मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी नागरीकांना केले आहे.









