सोलापूर जिल्हा भाजपा चे संघटन सरचिटणीस धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमोल राजगे यांचे वतीने वह्या भेट
अकलूज (प्रतिनिधी )सोलापूर जिल्हा भाजपा चे संघटन सरचिटणीस धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती अकलूज चे सहसचिव अमोल महादेव राजगे यांनी शालेय वह्या भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपत,गरीब विद्यार्थ्यांना शालेय वह्या मिळाव्यात या साठी अनोख्या पद्धतीने वाढदिवसाची भेट दिली व भैय्या ना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या…अशा कार्यक्रमांना शालेय वह्या भेट देऊन एक नवीन आदर्श निर्माण होत आहे.









