धैर्यशिल मोहिते पाटील यांचे वाढदिवसा निमित्त पोष्टिक आहार वाटप.
अकलूज (प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टी सोलापुर जिल्हा संघटन महामंत्री धैर्यशिल मोहिते पाटील यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चा चे वतीने अकलूज उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पोष्टिक आहार व फळे वाटप करण्यात आले.अकलूज ग्राहक मंचाचे अध्यक्ष लालासाहेब अडगळे व पञकार गणेश जाधव व उपजिल्हा रुग्णालयातील मुख्य डाॅक्टर नर्स व स्टाप यांचे शुभहस्ते किट वाटप करण्यात आले.या वेळी उपस्थित भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष.ॲड.रणजीत शंकरराव भोसले.बुरुड समाजाचे नेते संदिप वडतिले,जोशी समाज समिति संपर्क प्रमुख महावीर भोसले, सागर वाईकर सुर्यकांत वाईकर,व आदि कार्यकर्त उपस्थित होते.









