०६/०४/२००३भारतीय जनता पक्षाचा ४४ वा वर्धापनदिन माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी यांचे वतीने मळोली येथे मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याचे ध्वजारोहण श्री अभिमन्यू गुजर सर ( मा. मुख्याध्यापक )यांचे शुभहस्तेकरण्यात आले. यावेळी दुर्गामाता, अटलबिहारी वाजपेयी, पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन श्री ईश्वर शिंदे सर (मा. मुख्याध्यापक),श्री. चंद्रकांत जाधव (मा. उपसरंपच,मळोली व भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका उपाध्यक्ष ), श्री. शिवाजीराव जाधव (समन्वयक सोलापूर जिल्हा विश्वहिंदु परिषद) अँड.राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पक्षाच्या सर्वांगीण विकासावर गुजर सर यांनी विचार व्यक्त केले. भारतीय जनता पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त गावातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवशंकर वि.का.स. सोसायटीचे चेअरमन श्री. शशांक जाधव, व सर्व संचालक मंडळ तसेच माजी चेअरमन महादेव शिवाजी जाधव, श्री. अरुण पवार ,ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग जाधव, भिमराव मोरे तसेच जयराम जाधव, अंकुश देवकाते,आगतराव मदणे, नवनाथ जाधव, सौरभ जाधव, शंकर जाधव व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.आभार प्रदर्शन आणि सुत्रसंचालन श्री शिवाजीराव जाधव यांनी केले.









