अकलूज (पंढरीनाथ थोरात )
3 एप्रिल 2023 सोमवार रोजी *जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा यशवंतनगर* येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा *महर्षि महोत्सव 2023* हा विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता .या कार्यक्रमाचे उद्घाटन *यशवंतनगर ग्रामपंचायत चे माजी सरपंच आ. सौ.देवश्रीदेवी सत्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले*.सदरच्या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थिती यशवंतनगर ग्रामपंचायत चे उपसरपंच *श्री सत्यशील मोहिते पाटील* तसेच ग्रामपंचायत सदस्य अशोक शिंदे,सचिन डांगे,साठे, भोसले ,माजी उपसरपंच देशमुख, तसेच इतर सदस्य, विस्तार अधिकारी सौ.सायरा मुलाणी मॅडम, हर्षवर्धन नाचणे सर उपस्थित राहून मुलांचे कौतुक केले . शेतकरी गीत, कोळी गीत, लावणी, बालगीते, देशभक्तीपर गीत, नाटिका अशा सर्व प्रकारच्या गाण्याचा समावेश असणारा हा बहारदार कार्यक्रम उत्कृष्ट सादर झाला.पालकांचा उत्स्फूर्त सहभाग ,मुलांचे टाळ्यांचा वर्षावा बरोबर च रोख बक्षिसांचा वर्षाव करून मुलांचे कौतुक केले.महिला वर्गाची प्रचंड गर्दी दिसून आली.अनेक संघटनांचे पदाधिकारी ,पतसंस्थेचे आजी माजी तसेच विद्यमान चेअरमन ,व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, तसेच तालुक्यातील बरेच शिक्षक उपस्थित होते, मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षक यांनी सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते .यशवंतनगर केंद्रातील शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भरीव योगदान केले.










