सकल अकलूजकर यांचे वतीने गुढीपाडव्या निमित्त उत्साहात शोभायात्रा

अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथे सकल अकलूजकर यांचे वतीने गुढीपाडव्या निमित्त काढण्यात आलेल्या महिला व पुरुष शोभायात्रे चा शुभारंभ अकलूज ग्रामपंचायत चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गुढी व परमपवित्र भगव्या ध्वजाचे पुजन करून करण्यात आला.सदर शोभायात्रा शिवसृष्टी — रामायण चौक – आझाद चौक – गणेश नगर – प्रतापसिंह चौक — महर्षी चौक — शंकर नगर शिव स्मारक — सदूभाऊ चौक – गांधी चौक – जयशंकर उद्यान शिवतीर्थ – विजय चौक – शिवापुर पेठ – विठ्ठल मंदिर नगर परिषद – ते शिवसृष्टी किल्ला अशी मोटार बाईक रॅली काढून काढण्यात आली.त्यानंतर शिवसृष्टी किल्ला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर सर्वांनी एकजुटीने गारद व ध्येय मंत्र घेतला.सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.जय भवानी जय शिवराय व जय जिजाऊ जय शिवराय,जय श्रीराम,राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की अशा उत्साह पूर्ण घोषणा देत शिस्तीचे पालन करत अकलूजकरांनी नववर्षाच्या स्वागतासाठी बाईक शोभायात्रेचे आयोजन केले.यात महिला व पुरुष, मुले मोठया संख्येने सहभागी झाले होते.












