माळशिरस तालुक्यातील अंगणवाडी मध्ये मेगाभरती भरती सुरु-बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी आल्लडवाड.
अकलूज (प्रतिनिधी )एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प माळशिरस व अकलुज (ग्रामीण), पंचायत समिती माळशिरस ता. माळशिरस जि.सोलापुर अंतर्गत रिक्त अंगणवाडी सेविका / मिनी अंगणवाडी सेविका / अंगणवाडी मदतनीस पदभरती २०२३ सुरु करण्यात आली असुन, प्रकल्प माळशिरस व अकलुज मधील १) अंगणवाडी सेविका रिक्त पदे = ०४, २) मिनी अंगणवाडी सेविका रिक्त पदे = २०, ३) अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे = ८२ सोबत यादी जोडली आहे. याप्रमाणे रिक्त पदाची भरती करण्या करिता सदर गावातील/नगरपंचायत/नगरपालीका मधील वय वर्षे १८ ते ३५ वर्षे व विधवाकरिता ४० वर्षे या वयोगटातील इच्छुक महिला उमेदवाराकडुन दि. ३१/३/२०२३ ते १८/४/२०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय माळशिरस व अकलुज, पंचायत समिती माळशिरस ता. माळशिरस येथे अर्ज स्विकारण्यात ये आहेत. तरी सदर गावातील इच्छुक महिला उमेदवारांनी संपुर्ण कागदपत्रासह अर्ज सादर करण्याचे आवाहन श्री. बालाजी आल्लडवाड बालविकास प्रकल्प अधिकारी माळशिरस- अकलुज यांनी केले आहे.












Agnvadi sevka