बोरगाव येथे टिपरने धडक दिल्याने शिवाजी इंगोले यांचा जागीच मृत्यू ! ग्रामस्थांनी टिपरच्या काचा फोडल्या !
श्रीपूर (प्रतिनिधी )
श्रीपूर बोरगाव तालुका माळशिरस येथे आरोपी नीलआप्पा बिलॅनी आयवळे राहणार जंगलगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर याने टिपर नंबर mh13 cu 9216 हा टिपर अति वेगाने हाय गयीने चालवून सायकल स्वार शिवाजी श्रीपती इंगोले यास धडक देऊन त्यास गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याची नोंद अकलूज पोलीस स्टेशन येथे झाली आहे.अधिकवृत्त असेकीबोरगाव तालुका माळशिरस येथे दिनांक १४ मार्च२०२३ रोजी संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर बोरगाव जांभूड माळखांबी कॉर्नरच्या जवळ समाजमंदिरा समोर रोडवर सायंकाळी ६.४० च्या सुमारास शिवाजी श्रीपती इंगोले वय ७० हे सायकल वरून बोरगावहून जांभूड रोडवरुन इंगोलेवस्तीकडे घरी जात असताना मागून वेगाने आलेल्या टिपरने शिवाजी इंगोले यांना धडक दिल्याने आणि ते टिपरच्या मागील दोन्ही चाकाच्या मध्यभागी अडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला. टीपरला वेग असल्याने तो पुढे काही अंतरावर जाऊन थांबला. पण सायकलचे मात्र कसलेही नुकसान झाले नाही. सदर अपघाताची घटना टिपर चालकाच्या लक्षात आल्यानंतर चालकाने तेथून पळ काढला. सदर घटना बोरगाव गावात काही क्षणात कळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ठिकाणी गोळा होऊन संतप्त ग्रामस्थांनी टीपरच्या काचा फोडून रोष व्यक्त केला. याचवेळी सहकार महर्षी कारखान्याचे व्हा. चेअरमन अॅड. प्रकाशराव पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजकुमार पाटील, माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती प्रतापराव पाटील, पृथ्वीराज पाटील आदींनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांना शांतत ठेवण्याचे अवाहन केले. सदर अपघाताची माहिती अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांना समजताच ते सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे ,पोलीस कर्मचारी बाळासाहेब पानसरे, किशोर गायकवाड, प्रवीण हिंगणगावकर ,पोलीस कॉन्स्टेबल नागरगोजे, पोलीस कॉन्स्टेबल क्षिरसागर यांच्या समवेत घटनास्थळी येऊन घटनास्थळावरून ग्रामस्थांना बाजूला करून ॲम्बुलन्स मधून शिवाजी इंगोले यांचा मृत्यूदेह हलवला व अपघात स्थळावरून पोलिसांनी टिपर ताब्यात घेतला आहे. याचा अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे या करत आहेत.






