पांडुरंगचे कायकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांची को – जन असोसिएशनच्या संचालकपदी पुनश्च निवड
श्रीपुर(प्रतिनिधी )
श्रीपुर ता. माळशिरस येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांचीको जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या भारतामधील को जनरेशन प्रकल्पाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या असोसिएशनवर दुसऱ्यांदा बोर्ड ऑफ गव्हर्नर्सपदी (संचालक) बिनविरोध निवड झालेली आहे. डाॅ. यशवंत कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक, व्हा. चेअरमन कैलास खुळे, संचालक मंडळ व कामगार युनियन यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. को – जनरेशन असोसिएशनचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार हे आहेत तर माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ हे या असोसिएशनचे डायरेक्टर जनरल असून साखर कारखानदारी मधील विविध पदाधिकारी या संस्थेचे संचालक आहेत. डॉ.यशवंत कुलकर्णी हे पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर येथे गेले दहा वर्ष कार्यकारी संचालक या पदावर ते कार्यरत असून या कालावधीत त्यांनी कमीत कमी वाफेचा वापर करून अधिकची वीज निर्मिती केल्यामुळे कारखान्यास भारतातील सर्वोत्कृष्ट कोजन प्रकल्पाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे साखर आयुक्त यांनी गटीत केलेल्या अनेक शासकीय अभ्यास गटावर ते तज्ञ म्हणून काम पाहत आहेत. तसेच ते महाराष्ट्र एमडी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी ही कार्यरत असून सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची पद्धत, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, प्रत्येक गोष्टीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन या त्यांच्या अभ्यासू कामाच्या पद्धतीमुळे पुन्हा एकदा कोजन असोसिएशनच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.






